Department of Marathi

PHOTO GALLERY

विभागाविषयी माहिती

लोकशिक्षण संस्था द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयाची स्थापना १९९८ साली झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच मराठी विभाग बी.ए. पदवी स्तरासाठी अस्तित्वात आला. सर्वप्रथम बी.ए. पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक मराठी आणि मराठी वाङमय हे विषय अध्यापनासाठी सुरु झाले. पुढे बी.कॉम पदवी स्तरीय आणि एम.ए. पदव्युत्तर स्तरीय मराठी विषय सत्र २०१७-१८ पासून सुरु झाले. मराठी विभागातर्फे वर्षभर भाषा आणि साहित्यविषयक कार्यक्रम विविधरितीने राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या स्वरचित लेखनासाठी ‘अग्रेसर’ नामक भित्तीपत्रक वाचनालयात मराठी विभागातर्फे चालविले जाते. दरवर्षी मराठी भाषा आणि साहित्य विषयक अभिरुची निर्माण व्हावी म्हणून सर्व वर्गातील प्रातिनिधिक विद्यार्थी घेऊन मराठी वाङमयमंडळाची स्थापना केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी सुप्त गुणांचा विकास होतो. त्यासाठी मराठी विभागातील कार्यरत असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ग्रंथालयातील विविध वर्तमानपत्रे, मासिके, संदर्भग्रंथ, कोश वाङमय, ललित आणि ललितेतर साहित्य या सर्व ग्रंथाची माहिती दिली जाते. त्याचबरोबर लेखन, मुद्रण विषयक तांत्रिक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून महाविद्यालयातील संगणक कक्षात त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. साहित्याचे विद्यार्थी स्वतःचे आंतरिक गुणांचे प्रकल्प पी.पी.टी.च्या मध्यामातून इंटरनेट वापरून तयार करण्याचे शिकविले जाते. मराठी विभागांतर्गत पारंपारिक अधिव्याख्यान, गटचर्चा, दृकश्राव्य साधने, व्हॉटसअँप , गुगल क्लासरूम ध्वनिचित्रफित दाखवून अशारितीने विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. तसेच वर्षभर विद्यापीठ स्तरीय परीक्षा खेरीज नियमित वर्ग शिकवणी खेरीज घटक चाचणी, सराव परीक्षा घेतली जाते. त्यांचा निकालही महाविद्यालयांतर्गत परीक्षांतून दिला जातो याशिवाय उपचारात्मक शिक्षण म्हणून दुर्बल विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले जाते.
सत्र २०१९-२० पासून मराठी विभागाच्या विभागातर्फे ‘मराठी स्नेही मंडळ’ स्थापन करण्यात आले आणि या मंडळाच्या मार्फत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. सद्यस्थितीत महाविद्यालयातील मराठी विभागात मराठी विभाग प्रमुख म्हणून प्रा.डॉ.जयश्री शास्त्री सोबत डॉ.पल्लवी ताजने प्रा.सुरेखा येळवकर प्रा. रवींद्र पवार कार्यरत आहेत.आज पर्यंत मराठी विभागात स्थापनेपासून माननीय प्रा. श्रीकांत पाटील, डॉ.मदन कुलकर्णी, डॉ. आरती कुलकर्णी डॉ.देवगावकर डॉ.सौ.देवगावकर, डॉ.सौ.मृणालिनी बांडे, श्री राजाभाऊ चिटणीस, प्रा.डॉ.राजेंद्र नाईकवाडे, प्रा.डॉ.राजेंद्र वाटाणे,प्रा.डॉ.अजय कुलकर्णी, प्रा.बबन अवघडे, प्रा.मोक्षदा मनोहर, प्रा.डॉ.पद्मरेखा धनकर,प्रा.संजय भक्ते,प्रा.डॉ.संजयकुमार करंदीकर,प्रा.डॉ.तुकाराम रोंगटे, डॉ. श्याम मोहरकर,डॉ.माधवी भट या वक्त्यांची व्याख्याने संपन्न झालीत.
मराठी विभागातर्फे वर्षभर भाषेशी संबंधित विविध कार्यक्रम राबविले जातात .’अग्रेसर’ नामक भित्तीपत्रक वाचनालयात विद्यार्थ्यांच्या स्वरचित लेखनासाठी चालविले जाते. दरवर्षी सर्व वर्गातील प्रातिनिधिक विद्यार्थी घेऊन मराठी वांग्मय मंडळाची स्थापना केली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बहुआयामी सुप्त गुणांचा विकास होतो. मराठी विभागातील कार्यरत असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

Email id:- lmv.marathidepartment@gmail.com
Facebook Page :- https://www.facebook.com/lmvmarathivibhag/
Youtube Channel :- https://www.youtube.com/channel/UCSh0p7WJNCm0CG7w6wDKNNA

प्रा. डॉ. जयश्री प्रकाश शास्त्री
प्राध्यापक,
मराठी विभाग प्रमुख
लोकमान्य महाविद्यालय, वरोरा

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती
• बी.ए.-

महाविद्यालयात सहामाही सत्र पद्धतीने बी.ए.पदवी अभ्यासक्रम चालतो ज्यात आवश्यक मराठी आणि मराठी वांग्मय हे विषय अध्यापनासाठी आहेत करीता महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनमहाविद्यालयात मराठी विभाग स्थापन झाला होता . बी.ए.च्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून २०१७-१८ पासून CBCS पद्धती लागू झाली आहे.
अभ्यासक्रम
• बी. ए.मराठी https://unigug.ac.in/syllabus/
• बी. ए. मराठी साहित्य https://unigug.ac.in/syllabus/

• बी.कॉम. –
पदवी स्तरीय वाणिज्य अभ्यासक्रम महाविद्यालयात २०१६-१७ पासून उपलब्ध आहे. त्यातील एक अनिवार्य विषय म्हणून मराठी बी. कॉम. भाग १ आणि बी. कॉम भाग २ ला अध्ययनासाठी आहे.अभ्यासक्रमासाठी CBCS पद्धती विद्यापीठाकडून २०१७-१८ पासून लागू झाली असल्याने त्यानुसार अभ्यासक्रम घेतला जातो.

अभ्यासक्रम
• बी.कॉम. भाग १ – https://unigug.ac.in/syllabus/
• बी . कॉम. भाग २ – https://unigug.ac.in/syllabus/
• एम.ए.(मराठी)
सत्र २०१७-१८ पासून एम.ए.मराठी अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू झाल्याने पदवी ते पदवीत्तर शिक्षण असा विभागाचा विस्तार झाला.गोंडवाना विद्यापीठांतर्गत लोकमान्य महाविद्यालय येत असल्याने गोंडवाना विद्यापीठाचा एम.ए. मराठीचा अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविला जातो.२०२२-२३ या वर्षात एम. ए. मराठी विषयाचा अभ्यासक्रम बदलला आहे.
अभ्यासक्रम

• एम. ए. मराठी (जुना) https://unigug.ac.in/dept/index.php?sid=72#View%20Syllabus
• एम. ए.मराठी ( नवीन) https://unigug.ac.in/dept/index.php?sid=72#View%20Syllabus

• संशोधन केंद्र –
२६ फेब्रुवारीला २०२१ ला महाविद्यालयात मराठी विषयाच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. दिनांक १४ जुलै २०२१ रोजी महाविद्यालयाचे मराठी संशोधन केंद्राअंतर्गत दोन संशोधकांची नोंदणी प्रथमच झाली . या संशोधन केंद्रावर डॉ. जयश्री शास्त्री आणि डॉ. सुदर्शन दिवसे ही मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. या संशोधन केन्द्रा अंतर्गत एकूण पाच विद्यार्थी संशोधन करीत आहे.

विभागाची उपलब्धी –
डॉ. बंडू चौधरी –(एम. ए.(मराठी),नेट पीएच. डी )सहाय्यक प्राध्यापक ,समर्थ महाविद्यालय लाखनी
डॉ. पल्लवी ताजने –(एम. ए.(इतिहास ,मराठी),नेट(मराठी), पीएच. डी.
दीपक वाणी, एम. ए. मराठी भाग १ इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ स्तरीय मृदाकाम प्रतिनिधीत्व ,नाशिक (२०१८-१९)
सावन कीर्तने ,एम.ए. मराठी भाग १ इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ स्तरीय शास्त्रीय तबलावादन प्रतिनिधीत्व ,नाशिक (२०१८-१९)

• नियमित उपक्रम –
अग्रेसर भित्तिपत्रक
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषा गौरव दिन

• मराठी विभागाचे भाषा आणि साहित्य विषयक विशेष कार्यक्रम –

विन्दावलोकन
त्रिवार जयजयकार
Wikipedia कार्यशाळा

• एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा- cbcs in Language and Social Science
• एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र –‘समकालीन साहित्य-चिंतन आणि चिकित्सा’

विभागातील शिक्षक
२००६-२०२३
नाव पद शैक्षणिक पात्रता कार्यकाल
प्रा.डॉ.जयश्री प्रकाश शास्त्री प्राध्यापक एम. ए.(मराठी )नेट एम. एफ. ए.(संगीत)संगीत अलंकार ,पीएच. डी २००६ पासून
प्रा. देवेंद्र मनगटे CHB एम. ए.(मराठी ), बी. एड. नेट २००५-२०१३
प्रा.रजनीगंधा खिरटकर CHB एम. ए.(मराठी ,समाजशास्त्र),सेट. २०१३-२०२०
प्रा.शेषराव तराळे CHB एम . ए. (मराठी),बी.एड. २०१६-१८१९
डॉ. पल्लवी ताजने CHB एम.ए.(इतिहास,मराठी),सेट (मराठी),नेट (मराठी) पीएच.डी (इतिहास ) २०१९-२०२१
प्रा. निशिगंधा सोनेकर CHB एम. ए.(मराठी,समाजशास्त्र) बी. एड २०२१ -२०२२
प्रा. अर्चना भोगेकर CHB एम. ए.(मराठी,राज्यशास्त्र),बी. एड,नेट,सेट २०२१ -२०२३
प्रा. स्वप्नील कुथे CHB एम. ए.(मराठी) २०२२-२०२३
प्रा. रवींद्र पवार CHB एम. ए.(मराठी,इंग्लिश ),बी.एड. २०१७-२०२२
प्रा. सुरेखा येळवटकर CHB एम. ए.(मराठी,समाजशास्त्र,) बी. एड. २०१९-२०२३

शोधनिबंध